---Advertisement---

5 Powerful Steps to Awaken Inner Strength for Youth

|
Facebook
---Advertisement---

Discover 5 powerful steps to awaken inner strength in youth. Build confidence, mental resilience, and self-belief with practical guidance for personal and spiritual growth.

युवकांसाठी : आत्मशक्ती जागवण्याची ५ पावलं

आत्मशक्ती म्हणजे काही गूढ, अवघड गोष्ट नाही. ती अचानक आकाशातून पडत नाही. ती रोजच्या छोट्या निर्णयांतून हळूहळू जागी होते.

१️. “मी करू शकत नाही” ही भाषा बंद करा.

आत्मशक्तीची पहिली शत्रू आहे— स्वतःशी सतत नकारात्मक बोलणं. “माझ्यात टॅलेंट नाही”, “माझ्याकडून होणारच नाही” , “आपण साधे लोक” हे सगळं आत्मशक्तीला झोपवणारं बोलणं आहे.

 काय करा?

“होईल की नाही” हा प्रश्न बाजूला ठेवा. “मी प्रयत्न करेनच” इथून सुरुवात करा. आत्मशक्ती परिपूर्णतेतून नाही, ती प्रयत्नातून जागी होते.

२️ रोज एक छोटा पण ठाम निर्णय घ्या.

आत्मशक्ती मोठ्या भाषणाने वाढत नाही. ती लहान पण पक्क्या कृतीने वाढते.

उदा. आज ठरलेल्या वेळेला अभ्यासाला बसणं, आज व्यायाम न चुकवणं, आज खोटं न बोलणं, आज काम टाळणं नाही.

काय लक्षात ठेवा?

तुम्ही स्वतःला दिलेला शब्द पाळला, की आत्मशक्ती मजबूत होते. स्वतःवरचा विश्वास स्वतःलाच दिलेला शब्द पाळल्यानेच येतो.

३️ देहाची जबाबदारी स्वतः घ्या

थकलेला, झोप न झालेला, सतत स्क्रोल करणारा देह, आत्मशक्ती वाहून नेऊ शकत नाही. देह म्हणजे ओझं नाही; देह म्हणजे तुमचं साधन आहे.  

काय करा?

झोपेला वेळ द्या, शरीराला हालचाल द्या, अति जंक, अति उपास—दोन्ही टाळा, देह सांभाळणं म्हणजे स्वार्थ नाही; ते ध्येयासाठीची तयारी आहे.

४️ जबाबदारी घ्या, दोष देणं थांबवा

आत्मशक्ती आणि दोष देणं, एकत्र नांदत नाहीत. पालक जबाबदार सिस्टम चुकिची, नशीब खराब हे सगळं खरं असू शकतं, पण यामुळे आत्मशक्ती जागी होत नाही.

 काय करा?

“हे माझ्या हातात किती आहे?” हा प्रश्न विचारा. थोडी जरी जबाबदारी घेतली, तरी आत्मशक्ती जागी व्हायला सुरुवात होते.

५️ “मी वाढतोय” याचा रोज पुरावा द्या

आत्मशक्ती म्हणजे एकदम मोठा बदल नाही. ती म्हणजे— आजचा मी कालच्या मीपेक्षा थोडा चांगला असणं.

 काय करा? दिवसाच्या शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारा— “आज मी स्वतःसाठी काय केलं?”

एक नवं पान वाचलं? एक वाईट सवय थांबवली? एक भीती पार केली?

लहान प्रगती = मोठी आत्मशक्ती.

शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला देव व्हायचं नाही. तुम्हाला सुपरहिरोही व्हायचं नाही. तुम्हाला फक्त— स्वतःची शक्ती नाकारणं थांबवायचं आहे. नृषत् म्हणजे— आत्मशक्ती असलेला मनुष्य नव्हे, आत्मशक्ती वापरायला सुरुवात करणारा मनुष्य.

आज एक पाऊल टाका. उद्या आत्मशक्ती तुमच्यासोबत चालू लागेल.

Rupali

नमस्कार, मी रूपाली महादू लामखडे – व्यवसायानं Software Developer पण मनानं सदैव अध्यात्माशी जोडलेली. 2018 पासून अध्यात्मिक प्रवास सुरू झाला आणि श्रीमद्भगवद्गीता माझ्या जीवनाचा दीपस्तंभ ठरली. या ब्लॉगद्वारे माझं आणि माझ्या वडिलांचं एकच ध्येय आहे – गीतेचा दिव्य संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि तो प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यासाठी प्रेरणा देणे.

Leave a Comment