---Advertisement---

Navratri Day 7 – To Distroy the Darkness

|
Facebook
---Advertisement---

✨ देवी रूप – कालरात्रि माता

अर्थ: अंधकार नष्ट करणारी देवी.

आत्मिक संदेश: मनातील अहंकार, राग, ईर्ष्या यांसारखे नकारात्मक संस्कार नष्ट करणे.

आत्म्याची सातवी शक्ती दैवी गुणांकडे नेणारे,

Power To Face – सामोरं जाण्याची शक्ती

नवरात्रीचा सातवा दिवस कालरात्रि माता यांना अर्पण केला जातो.

त्या अज्ञान, अंधकार आणि नकारात्मक शक्तींचा नाश करणारी देवी म्हणून पूजल्या जातात.

अध्यात्मिक अर्थ:

सातवा दिवस हा आपल्याला आत्म्यातील अंधकार व दुर्गुण नष्ट करण्याचा संकल्प करायला शिकवतो.

1. अहंकार व नकारात्मकतेचा नाश – राग, लोभ, मत्सर, इर्षा, द्वेष हेच खरे राक्षस शक्ती आहे. राजयोग ध्यानाने आपण या वृत्तीपासून स्वतःला मुक्त करू शकतो.

2. आत्मिक धैर्य – स्वतःतील दुर्गुणांचा नाश केल्याशिवाय खरी शांती मिळत नाही. त्यामुळे काल रात्री हा आत्मजागृतीचा दिवस आहे.

3. प्रकाशाचा अनुभव – अंधकार म्हणजे विस्मरण – मी कोण आहे हे विसरणं. प्रकाश म्हणजे स्मरण – मी शाश्वत आत्मा आहे व परमात्मा माझा आधार आहे.

ध्यान व साधना:

1. मी राग मच्छर व नकारात्मक विचारांचा पूर्ण नाश करतो/करते.
2. मी शुद्ध व दिव्य आत्मा आहे माझ्यात कोणतेही दुर्गुण टिकून राहू शकत नाही.
3. मी परमपित्याच्या स्मरणातून प्रकाश रूप होतो होते
4. माझ्या उपस्थितीत नकारात्मकता नाहीशी होते.

Rupali

नमस्कार, मी रूपाली महादू लामखडे – व्यवसायानं Software Developer पण मनानं सदैव अध्यात्माशी जोडलेली. 2018 पासून अध्यात्मिक प्रवास सुरू झाला आणि श्रीमद्भगवद्गीता माझ्या जीवनाचा दीपस्तंभ ठरली. या ब्लॉगद्वारे माझं आणि माझ्या वडिलांचं एकच ध्येय आहे – गीतेचा दिव्य संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि तो प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यासाठी प्रेरणा देणे.

Leave a Comment