---Advertisement---

Navratri Day 8 – Power of Purity

|
Facebook
---Advertisement---

देवी रूप – महागौरी माता

अर्थ: पारंपरिक दृष्टीने या दिवशी महागौरी माता, म्हणजेच शुद्धता, शांतता आणि सौंदर्याची देवी, पूजली जाते.

आत्मिक संदेश: त्या सर्व पाप व अंधकार नष्ट करून निर्मळता आणि पावित्र्य प्रदान करतात.

आत्म्याची आठवी शक्ती दैवी गुणांकडे नेणारे,

Power Of Purity – शुद्धता

अध्यात्मिक अर्थ:

शुद्ध विचारांची शक्ती – आत्म्याचे खरे सौंदर्य बाह्य रूपात नसून विचार आणि भावनांच्या निर्मळतेत आहे.
जेव्हा विचार पवित्र असतात, तेव्हा चेहऱ्यावर आपोआप दिव्यता झळकते.

शांततेचा प्रकाश – शुद्ध आत्मा सदैव शांत असतो. परमात्म्याशी योग केल्याने मन स्थिर होते आणि आत्म्यातून शांततेचा प्रकाश पसरतो.

स्वच्छता आणि सात्विकता – आजचा दिवस शरीर, मन आणि वातावरण — तिन्हींची स्वच्छता राखण्याची प्रेरणा देतो. सात्विक अन्न, स्वच्छ बोलणे आणि सुसंस्कारित वर्तन हेच खरे पूजन.

ध्यान व साधना:

1. मी परमात्म्याच्या स्मरणातून दिव्य तेजस्वी आत्मा म्हणून झळकतो/झळकते.
2.मी शुद्ध विचार, शुद्ध वाणी आणि शुद्ध कर्म यांचा धनी/धनीनी आहे.
3. माझ्या शुद्धतेमुळे वातावरणात शांती व सौंदर्य निर्माण होते.
4. माझ्या अंतःकरणातील प्रेम आणि पावित्र्य हेच माझे अलंकार आहेत.

Rupali

नमस्कार, मी रूपाली महादू लामखडे – व्यवसायानं Software Developer पण मनानं सदैव अध्यात्माशी जोडलेली. 2018 पासून अध्यात्मिक प्रवास सुरू झाला आणि श्रीमद्भगवद्गीता माझ्या जीवनाचा दीपस्तंभ ठरली. या ब्लॉगद्वारे माझं आणि माझ्या वडिलांचं एकच ध्येय आहे – गीतेचा दिव्य संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि तो प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यासाठी प्रेरणा देणे.

Keep Reading

|
by Rupali
|
by Rupali

Leave a Comment