---Advertisement---

Do not disrespect food | अन्नाची निंदा करू नका

|
Facebook
---Advertisement---

अन्नाचे निंदा करू नका आणि अन्नाची निंदा न करण्याचे वृत्त जीवनात बाळगा. आपण भार्गवी वारुणी विद्येचा विचार करीत होतो. त्यात सांगितले होते की अन्न तीन प्रकारच्या असते. शरीराचे, मनाचे, आणि आत्म्याचे. 

शरीराचे अन्न म्हणजे जे आपण रोज खातो ते. मनाचे अन्न म्हणजे भावना. भावनांनी मन पुष्ट होते, शक्तिमान बनते. डोळ्यातून भले अश्रू आले तरी ते स्वार्थी, दुबळे वा क्षुद्र नसावेत. भावनात्मक आश्रू असले पाहिजे. भाव हे मानवी मनाचे अन्न आहे. आत्म्याचे अन्न म्हणजे ईश्वराशी तादात्म्य. या तीनही अन्नाची निंदा करू नका.

तरुण मुलगी माहेरून सासरी परत जाते तेव्हा तिला काही दुःख होत नाही. उलट, थोडे दिवस माहेरी राहिल्यावर कधी सासरहून पत्र येईल याची ती वाट पाहत असते. पत्र यायला दोन दिवस उशीर झाला तर तिच्याने राहवत नाही. म्हणून खरे तर सासरी जाण्यात तिला दुःख नसते. पण माहेरच्या माणसांचे प्रेम डोळ्यासमोर आले की, तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. ते भावनांचे अश्रू असतात.

गुरु शिष्याची पाठवणी करतो तेव्हा गुरुच्या डोळ्यात जे अश्रू उभे राहतात ते दिव्य अश्रू असतात. ते भावनेचे अश्रू असतात‌.

आत्म्याचे अन्न म्हणजे देवा सोबतचे तादात्म्य. आत्म्याची सतत मागणी आहे की माझ्या देवासोबत मी तादात्म्य साधीन. आत्म्याच्या या अन्नाची सुद्धा निंदा करू नका. एवढेच नव्हे तर त्याची निंदा न करण्याचे वृत्त घ्या.

मानवी जीवन, हे आयुष्य म्हणजे केवढी तपश्चर्या करून मिळवलेली वस्तू. समुद्राच्या लाटांवरच्या फेसासारखे. असे आयुष्य मिळवल्यानंतर देखील केवळ मासमीमांसा म्हणजे देह, स्री, पुत्र, अनुचर, कीर्ती, पैसा यांचीच मीमांसा करीत बसायचे? माणसाने हा विचार केला पाहिजे की, या साऱ्यांना कशामुळे शोभा आहे? पत्नी पुष्कळ सुंदर आहे, पण कधीपर्यंत? आत प्राण असेतो पर्यंतच. प्राण निघून गेल्यावर त्याला काही अर्थ उरत नाही.

प्राण हे शरीराचे अन्न आहे. त्याची निंदा व उपेक्षा करता कामा नये. पुढे जाऊन श्रुती हे सुद्धा सांगते की, प्राणामुळे शरीर प्रतिष्ठित आहे. आणि म्हणून प्राण हे शरीराचे अन्न आहे‌. अन्नामुळेच आपल्याला प्रतिष्ठा आहे.

वरील लिखाणात अन्नाचे महत्त्व आणि त्याबद्दल आदर ठेवण्याचा विचार प्रभावीपणे मांडला आहे. अन्न केवळ शारीरिक गरज पूर्ण करणारे नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक पोषण देखील प्रदान करते, हे विचार प्रेरणादायक आहेत.

या लेखाचे काही मुख्य मुद्दे:

1. अन्नाचे तीन प्रकार:

  • शरीराचे अन्न: आपल्या दैनंदिन खाण्यापिण्याने शरीराला पोषण मिळते.
  • मनाचे अन्न: भावना आणि विचार हे मनाचे अन्न आहेत. भावनिक दृष्टिकोनाने मन शक्तिशाली बनते.
  • आत्म्याचे अन्न: आत्म्याचे अन्न म्हणजे ईश्वराशी तादात्म्य. हे आध्यात्मिक पोषण आहे.

2. भावनांचे महत्त्व:

डोळ्यातून वाहणारे अश्रू स्वार्थी नसावेत; ते भावनिक, शुद्ध, आणि दिव्य असावेत. उदाहरणार्थ, माहेर आणि सासरातील नाते किंवा गुरु-शिष्याचे नाते.

3. प्राणाचे महत्त्व:

प्राण हे शरीराचे खरे पोषण आहे. त्याशिवाय जीवनाचा काही उपयोग नाही. म्हणून प्राण, अन्न, आणि जीवनाची कदर करणे आवश्यक आहे.

4. आयुष्याची किंमत:

आयुष्य म्हणजे मोठ्या तपश्चर्येने मिळवलेली वस्तू आहे. केवळ सांसारिक सुखांमध्ये हरवून न जाता त्यामागील आध्यात्मिक सत्याचा शोध घेतला पाहिजे.

शिकवण:

अन्न, भावना, आणि आत्म्याच्या पोषणाचा आदर करणे आणि त्यांच्या निंदा न करण्याचे व्रत घेणे ही आपल्याला समज देणारी शिकवण आहे. मानवी जीवनाचे महत्त्व समजून त्याचा सार्थ वापर करण्याची प्रेरणा या लिखाणातून मिळते.

Rupali

नमस्कार, मी रूपाली महादू लामखडे – व्यवसायानं Software Developer पण मनानं सदैव अध्यात्माशी जोडलेली. 2018 पासून अध्यात्मिक प्रवास सुरू झाला आणि श्रीमद्भगवद्गीता माझ्या जीवनाचा दीपस्तंभ ठरली. या ब्लॉगद्वारे माझं आणि माझ्या वडिलांचं एकच ध्येय आहे – गीतेचा दिव्य संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि तो प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यासाठी प्रेरणा देणे.

Leave a Comment