नवरात्री दिवस 2 – Bhamhacharini Devi
- गुण : तप आणि साधनेसाठी प्रसिद्ध
- अर्थ : आत्मस्फूर्तीचे तप धारण करणे.
- संदेश : ब्रह्मचर्य व सात्विक जीवनशैलीचा स्वीकार.
नवरात्रीत प्रत्येक दिवस देवीच्या वेगळ्या रूपाची उपासना करण्याचा असतो. ब्रह्माकुमारी परिवाराच्या अध्यात्मिक मार्गदर्शनानुसार दुसऱ्या दिवशीची उपासना मां दुर्गेच्या ब्रह्मचारिणी या स्वरूपाला समर्पित असते.
आत्म्याची दुसरी शक्ती दैवी गुणांकडे नेणारे,
2. Power to Patience – सहन करण्याची शक्ती.
मा ब्रह्मचारिणी ही तपश्चर्या( Penance), संयम (Patience) व साधनेचे प्रतीक ओळखली जाते. ब्रह्मचारिणी देवीत धैर्य, सहशीलता, शुद्धता व साधेपणा आहे. ही देवी आपल्याला असा संदेश देते की, आत्म्याला शक्तिशाली करण्यासाठी संयम निश्चय आहे आणि साधना ही आवश्यक आहे.
ब्रह्मचारी या शब्दाचा अर्थ, ब्रह्म म्हणजे परमात्मा आणि चारिणी म्हणजे आचरण करणारे. याचाच अर्थ असा की परमात्म्याशी जोडले राहून आपण जीवनात सात्विकता आचरणात करणे.
शिकवण:
ब्रह्मकुमारी या परिवाराने ब्रह्मचारीने देवीचा अर्थ हा बाह्य पूजा ऐवजी अंतर्मनाला शोधला आहे.
- आत्मिक शक्तीची साधना : राजयोग ध्यानाद्वारे आत्म्याला शुद्ध व शक्तिशाली बनवणे.
2. जीवनात संयम : विचार, वाणी व आचरणात संयम राखणे.
3. तपश्चर्या : चुकीच्या संस्कारांवर विजय मिळवणे व दैवी गुणांचा अंगीकार करणे.
4. आध्यात्मिक शौर्य : परिस्थिती कठीण असली तरी धैर्य न सोडणे.
ध्यान व साधना :
- सकाळी ध्यान धारणा करून स्वतःला देवी ब्रह्मचारिणीचे गुण आत्मसात करण्यासाठी प्रेरित करा.
- परमात्म्याची जोडून मी शांतीस्वरूप आत्मा आहे हा संकल्प करा.
- दिवसभरात संयमित वाणी आणि शुद्ध संकल्प यांचा सराव करा.
- कुटुंब समाज आणि कार्यक्षेत्रात शांतता व सहकार्याची वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा.
अशाच प्रकारे नवरात्रीचा दुसरा दिवस केवळ देवीची बाह्य पूजा करणे नसून आत्म्याच्या शुद्धीकरण व संयमी जीवनाचा संदेश देत आहे.