✨ देवी रूप – कूष्मांडा
अर्थ: विश्वनिर्मितीची शक्ती.
आत्मिक संदेश: सकारात्मक विचारांनी वातावरण बदलते. प्रत्येक परिस्थितीत सकारात्मकता पसरवावी.
आत्म्याची चौथी शक्ती दैवी गुणांकडे नेणारे,
4. The Power Of Creating a New Universe –
नवरात्रीचा चौथा दिवस कूष्मांडा यांना अर्पण केला जातो.
पारंपरिक दृष्टीने हा दिवस विश्वाची निर्मिती करणाऱ्या कूष्मांडा मातेला समर्पित आहे.
“कूष्मांड” म्हणजे लहानशा हसण्याने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करणारी शक्ती.
अध्यात्मिक अर्थ:
दिवस आपल्याला सकारात्मकता व सर्जनशील शक्ती जागृत करण्याची आठवण देतो.
1. सकारात्मक विचारांची शक्ती
आत्म्याचे प्रत्येक विचार वातावरणावर परिणाम घडवतात. जेव्हा आपण सात्विक, शुद्ध विचार करतो तेव्हा आपल्या आसपासही शांती आणि आनंदाची लहर निर्माण होते.
2. निर्मितीची शक्ती
जसे कूष्मांडा माता विश्वनिर्मितीचे प्रतीक आहेत, तसेच प्रत्येक आत्म्यामध्येही नवीन संस्कार निर्माण करण्याची शक्ती आहे. जुन्या कमकुवत संस्कारांना बदलून नवे दैवी गुण आत्मसात करणे ही खरी साधना.
3. स्मरण (योग साधना)
परमात्म्याशी जोडलेले राहून आपल्या मनात प्रकाश आणि उमेद निर्माण करणे, हाच या दिवसाचा खरा आध्यात्मिक संदेश आहे.
ध्यान व साधना:
1. मी प्रत्येक क्षणी सकारात्मक विचार निर्माण करतो/करते.
2. माझ्या विचारांनी आणि शब्दांनी मी वातावरणात प्रकाश, आनंद आणि उमेद पसरवतो/पसरवते.
3. मी स्वतःला सृष्टिचा सह-निर्माता समजतो/समजते, कारण मी परमात्म्याच्या शक्तीने नव्या संस्कारांची निर्मिती करू शकतो/शकते.









Gotta say, 78winvip is growing on me. The VIP perks are actually pretty decent. If you’re looking for a place with a little extra something, check them out: 78winvip