---Advertisement---

Navratri Day 6 – Fearlessness and defense of truth

|
Facebook
---Advertisement---

देवी रूप – कात्यायनी देवी

अर्थ: धैर्य आणि न्यायाची शक्ती.

आत्मिक संदेश: अन्यायाविरुद्ध उभे राहणे, पण क्रोधाशिवाय – निर्भयता आणि सत्याचे रक्षण करणे.

आत्म्याची सहावी शक्ती दैवी गुणांकडे नेणारे,

The power of courage and justice – धैर्य आणि न्यायाची शक्ती

नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी माता यांना अर्पण केला जातो.

पारंपरिक दृष्टीने हा दिवस कात्यायनी माता पूजनासाठी असतो. त्या धैर्य, शौर्य आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती यांचे प्रतीक आहेत.

अध्यात्मिक अर्थ:

सहावा दिवस हा आपल्याला निर्भयता आणि सत्याची शक्ती जागृत करण्याची प्रेरणा देतो.

1. आत्मस्मरणातून धैर्य – आत्मा जेव्हा स्वतःला शाश्वत अविनाशी आत्मा म्हणून ओळखतो आणि परमात्म्याशी जोडतो तेव्हा त्याला खरे धैर्य मिळते.

2. निर्भयता – भीतीही अज्ञानातूनच येते आत्मा आपली खरी ओळख जाणतो तेव्हा तो निर्णय होतो आणि परिस्थिती समोर ताट उभा राहतो.

3. न्याय व सत्याचा आधार – अन्याय असत्य किंवा नकारात्मक संस्कारांसोबत नि नव्हे तर शांततेच्या शक्तीने त्यांना बदलणे हाच खरा अध्यात्मिक अर्थ आहे.

ध्यान व साधना:

1. मी प्रत्येक परिस्थितीत सत्य व न्यायच्या बाजूनेच उभा राहतो किंवा उभी राहते.

2. आत्मरूपाने निर्भय आणि शक्तिशाली आहे.

3. परमात्म्याची जोडून मी धैर्य व शक्ति अनुभवते/अनुभवतो.

4. मी नकारात्मकतेवर शांततेच्या शस्त्राने विजय मिळवतो/मिळवते.

Rupali

नमस्कार, मी रूपाली महादू लामखडे – व्यवसायानं Software Developer पण मनानं सदैव अध्यात्माशी जोडलेली. 2018 पासून अध्यात्मिक प्रवास सुरू झाला आणि श्रीमद्भगवद्गीता माझ्या जीवनाचा दीपस्तंभ ठरली. या ब्लॉगद्वारे माझं आणि माझ्या वडिलांचं एकच ध्येय आहे – गीतेचा दिव्य संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे आणि तो प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यासाठी प्रेरणा देणे.

Leave a Comment