✨ देवी रूप – स्कंदमाता
अर्थ: मातृत्व व करुणेची देवी.
आत्मिक संदेश: निर्व्याज प्रेम आणि करुणा या गुणांना आत्म्यात प्रकट करणे.
आत्म्याची पाचवी शक्ती दैवी गुणांकडे नेणारे,
Power of Love – मातृत्व
नवरात्रीचा पाचवा दिवस स्कंदमाता यांना अर्पण केला जातो.
स्कंदमाता देवी ही मातृत्व प्रेम करुणा आणि संरक्षण यांचे प्रतीक आहे
अध्यात्मिक अर्थ:
पाचवा दिवस आपल्यासाठी निर्वाज प्रेम व करुणा जागृत करण्याचा संदेश देतो.
1. मातृत्वाची ऊर्जा – प्रत्येक आत्म्यास इतरांना स्वीकारण्यासाठी जपण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी शक्ती असते हाच मातृत्वाचा आध्यात्मिक अर्थ.
2. करुणा व सहानुभूती – अध्यात्मिक साधकाने इतरांच्या सुखदुःखाची एकरूप होऊन मदत करणे पण स्वतःला नकारात्मकतेत बुडवून न देणे.
3. निर्व्याज प्रेम – परमात्म्याच्या अमर्याद प्रेमाशी जोडले गेले की, आत्मा इतरांसाठीही तसेच निर्व्याज प्रेमाचा स्रोत बनतो.
ध्यान व साधना:
1.मी प्रेम आणि करुणा या शक्तींचे मूर्त स्वरूप आहे.
2. मी सर्व आत्म्यांना बंधुभावाने पाहतो/पाहते.
3. माझ्या शब्दांनी आणि कृतींनी मी इतरांना सांत्वना व आधार देतो/देते.
4. परमात्म्याशी जोडून मी निर्व्याज मातृप्रेम अनुभवतो/अनुभवते.








