देवी रूप – महागौरी माता
अर्थ: पारंपरिक दृष्टीने या दिवशी महागौरी माता, म्हणजेच शुद्धता, शांतता आणि सौंदर्याची देवी, पूजली जाते.
आत्मिक संदेश: त्या सर्व पाप व अंधकार नष्ट करून निर्मळता आणि पावित्र्य प्रदान करतात.
आत्म्याची आठवी शक्ती दैवी गुणांकडे नेणारे,
Power Of Purity – शुद्धता
अध्यात्मिक अर्थ:
शुद्ध विचारांची शक्ती – आत्म्याचे खरे सौंदर्य बाह्य रूपात नसून विचार आणि भावनांच्या निर्मळतेत आहे.
जेव्हा विचार पवित्र असतात, तेव्हा चेहऱ्यावर आपोआप दिव्यता झळकते.
शांततेचा प्रकाश – शुद्ध आत्मा सदैव शांत असतो. परमात्म्याशी योग केल्याने मन स्थिर होते आणि आत्म्यातून शांततेचा प्रकाश पसरतो.
स्वच्छता आणि सात्विकता – आजचा दिवस शरीर, मन आणि वातावरण — तिन्हींची स्वच्छता राखण्याची प्रेरणा देतो. सात्विक अन्न, स्वच्छ बोलणे आणि सुसंस्कारित वर्तन हेच खरे पूजन.
ध्यान व साधना:
1. मी परमात्म्याच्या स्मरणातून दिव्य तेजस्वी आत्मा म्हणून झळकतो/झळकते.
2.मी शुद्ध विचार, शुद्ध वाणी आणि शुद्ध कर्म यांचा धनी/धनीनी आहे.
3. माझ्या शुद्धतेमुळे वातावरणात शांती व सौंदर्य निर्माण होते.
4. माझ्या अंतःकरणातील प्रेम आणि पावित्र्य हेच माझे अलंकार आहेत.












