मला असे निरस आणि शूद्र जीवन नको. जीवनात आकाशातल्या विजेसारखे चैतन्य Spark असला पाहिजे. देवाने मला दीर्घायुष्य दिले नाही तरी चालेल, पण त्यात चैतन्य असले पाहिजे.
जीवनात काहीतरी करायचं आहे, जीवणाचा दृष्टिकोन बदलायचा आहे तर त्यासाठी उपनिषद वाचले पाहिजे. तर जीवनदर्शन मिळेल. भार्गवी आणि वारुणी विद्येमध्ये हे जीवनदर्शन आहे. त्याच्याने शुद्ध जीवनाची ओढ निर्माण होईल, तेजस्वी जीवनाची ओढ निर्माण होईल, दैवी जीवनाचा लोभ जडेल. आणि प्रगती साधण्याची मनिषा निर्माण होईल. गिबनने पंचवीस पंचवीस वर्ष इतिहास लिहिला. त्यासाठी त्याने किती परिश्रम घेतले असतील! त्याने लिहिलेल्या इतिहासाशी आपण सहमत असू की नाही ही स्वतंत्र गोष्ट आहे. पण त्याला इतिहास लिहिण्याचे जणू काही वेडच लागले होते. ज्या दिवशी त्याने लेखन पूर्ण केले आणि हातातली लेखणी खाली ठेवली त्या दिवशी तो अखेर रात्रभर रडला. त्याला वाटले की आता उद्या सकाळी मी काय करू? पण भागवत् भक्त अशाप्रकारे रडत नाहीत कारण आता मी काय करू असा त्यांना प्रश्न पडत नाही. ते सतत भगवंताचे काम करीत असतात; जे कधी पूर्ण होतच नाही. जन्म जन्मांतरापर्यंत चालत राहील असे ते काम आहे.
तात्पर्य हे की जीवनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. भार्गवी आणि वारुणी विद्येने माणूस महान् भवति – महान बनतो. त्याचे जीवन प्रगल्भ बनते. त्याच्या जीवनात विद्युलतेसारखे चैतन्य असते. तो तेजस्वी असतो. ज्याचे जीवन निरस आहे, ज्याच्या जीवनात विजिगीषा नाही असा माणूस त्याच्या पत्नीला सुद्धा आवडत नाही. त्याच्या मुलाचे सुद्धा त्याच्यावर प्रेम जडत नाही.
भार्गवी-वारुणी विद्येने परलोकात सुद्धा महान कीर्ति मिळते. त्या विद्येचे श्रवण, चिंतन, मनन केल्याने जीवन दैवी बनते. लहान मुलांना ही दैवी विद्या सतत समजावली पाहिजे. तरच त्यांच्या जीवनाचा दृष्टिकोन बदलेल. त्यांचे जीवन दैवी आणि अलौकिक बनेल.
हातोड्याच्या एखाद दोन घावांनी दगड फुटत नाही. एकोणपन्नासाव्याव्या घावाने देखील काही होत नाही. पण पन्नासाव्या घावाने कदाचित दगड फुटतो. अशाच प्रकारे या दैवी विद्येचे सतत Hammering केले पाहिजे. तरच जीवा शिवाचे मिलन होईल.
तरुणांनी आणि मुलांनी देखील ही दैवी भार्गवी वारुणी विद्या शिकली पाहिजे. ही राजविद्या आहे. राजविद्या म्हणजे राजाची विद्या नव्हे. राजविद्या म्हणजे माणसाला, जीवाला राजा बनविणारी विद्या. जगात मी राजा आहे, गुलाम नाही. मी भगवंताचा सुद्धा नोकर नाही. मी भगवंताचा मुलगा आहे. गीतेमध्ये भगवंताने स्वतः सांगितले आहे. भार्गवी वारुणी विद्येमुळे माणूस राजा बनतो. नोकर न राहता भगवंताचा मुलगा बनतो. देव बनतो.भृगूनां नमस्कार केल्याशिवाय भार्गवी विद्या प्राप्त नाही होत. ही संजीवनी विद्या आहे.
जीवनदर्शन
जीवन हे केवळ कालचक्राच्या गतीने पुढे जाणारे प्रवाह नसून, त्याला चैतन्य, तेजस्वीपणा आणि अर्थपूर्णता असावी लागते. जीवनाचा खरा आनंद हा त्याच्या गाभ्यातील प्रेरणेने आणि तत्त्वज्ञानाने आहे. निरस आणि शुष्क जीवन न जगता, जीवनाच्या प्रत्येक क्षणाला चैतन्याची अनुभूती देणारे जीवन कसे घडवता येईल, याचा विचार उपनिषदांमधून करता येतो.
भार्गवी आणि वारुणी विद्या
भार्गवी-वारुणी विद्या जीवनदर्शनाचा आधार आहे. ही विद्या केवळ ज्ञान किंवा तत्त्वज्ञान नाही, तर ती जीवनात तेजस्वीपणा, चैतन्य, आणि शुद्धता आणणारी विद्या आहे. ही विद्या शिकून माणूस दैवी जीवनाचा अनुभव घेऊ शकतो. तिच्या सतत चिंतनाने आणि मननाने माणूस प्रगल्भ बनतो, आणि त्याच्या जीवनात एक प्रकारचे तेज निर्माण होते.
जीवनाला विजिगीषा (आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा) असली पाहिजे. विजिगीषा नसलेले जीवन केवळ जगण्यासाठी आहे, पण विजिगीषा असलेले जीवन महानतेसाठी आहे. भार्गवी-वारुणी विद्येने आपण आपल्या जीवनातील प्रत्येक कण तेजस्वी करू शकतो.
संजीवनी विद्या
ही विद्या जीवनाला नवचैतन्य देते. ती राजविद्या आहे, कारण ती माणसाला गुलामगिरीतून बाहेर काढते आणि स्वाभिमानाने जीवन जगायला शिकवते. गीतेत भगवंताने सांगितल्याप्रमाणे, आपण भगवंताचे सेवक नव्हे तर त्याचे पुत्र आहोत. या विद्येचे चिंतन माणसाला जीवनाचा खरा अर्थ कळायला शिकवते आणि त्याला दैवी जीवनाकडे नेते.
विद्येचे महत्व
विद्येचे शिक्षण लहानपणापासून दिले पाहिजे. एखाद्या दगडावर कितीही घाव घातले तरी तो शेवटच्या घावाने फुटतो, त्याचप्रमाणे भार्गवी-वारुणी विद्येचा अभ्यास सातत्याने केल्याने माणसाच्या अंतःकरणात परिवर्तन घडते. सतत ह्या विद्येचे श्रवण आणि मनन केल्याने जीवन तेजस्वी आणि महान बनते.
तात्पर्य
जीवनाचा खरा अर्थ शोधायचा असेल तर उपनिषदांचे चिंतन केले पाहिजे. जीवनाला तेजस्वी बनवायचे असेल तर भार्गवी-वारुणी विद्येचा स्वीकार करावा. अशा दैवी जीवनदर्शनानेच आपण महान होऊ आणि आपले जीवन अर्थपूर्ण व अलौकिक होईल.
NICE